शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आज बकरी ईद : सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:16 AM

इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद आज शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाणार आहे.

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा दुसरा मोठा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद आज शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी केली जाणार आहे. ईदच्या सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने नियोजित जागेवर सकाळी संपन्न होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. पाऊस असला तरी नमाजपठण इदगाह मैदानावर केले जाणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.  पावसाच्या संततधारेने ईदगाह मैदानावर जमलेले पाणी जमिनीत मुरले असून, सोमवारी दिवभर कुठेही डबके साचलेले नव्हते. तसेच चिखलाचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे नमाजपठण करणे सहज शक्य होणार आहे. मुस्लीम बांधवांनी नमाजपठणाच्या सोहळ्यासाठी इदगाहवर येताना रेनकोट, छत्री तसेच पावसाच्या पाण्यात ओले होणार नाही, अशाप्रकारचे पाणकापड सोबत आणावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. नमाजपठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार आहे. नेहमीप्रमाणे इदगाहच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर शुचिर्भूत होण्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे इदगाह समितीच्या वतीने सांगण्यात आले. पावसाची उघडीप मंगळवारी दिवसभरात जेवढी मिळाली त्या वेळेत महापालिका कर्मचाऱ्यांकडून मैदानावर साचलेल्या काही ठिकाणच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये मुरूम टाकला गेला. रोलरद्वारे मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे, जेणेकरून मातीचा दाब पक्का राहून चिखलाची समस्या उद्भवणार नाही. एकूणच नमाजपठणाच्या सोहळ्याची जय्यत तयारी इदगाह मैदानावर करण्यात आली आहे. पावसामुळे मैदान आलेचिंब जरी झाले असले तरी चिखलाचे प्रमाण कमी असल्याने नमाजपठणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकदृष्ट्या बकरी ईदला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदपासून पुढे सलग तीन दिवस ‘कुर्बानी’ करण्याची प्रथा आहे. याचदरम्यान हज यात्राही पूर्ण केली जाते.मशिदींमध्येही होणार नमाजपठणबकरी ईदनिमित्त सकाळी पारंपरिक पद्धतीने जुने नाशिकसह सिडको, सातपूर, वडाळागाव, नाशिकरोड, देवळालीगाव, भगूर आदी उपनगरीय भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणाचे नियोजन करण्यात आले आहे. मशिदीच्या प्रमुख धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली नमाजपठण संपन्न होणार आहे. दरम्यान, मुस्लीमबांधवांनी ईदची तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनी नवे कपडे खरेदी केले आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीम