शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

राज्यातील २६ लाख विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी मोहीम

By vijay.more | Published: September 17, 2018 6:22 PM

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात़ तंबाखूच्या व्यसनापासून विद्यार्थी दूर राहावेत यासाठी ‘प्लेज फॉर लाईफ’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले असून, त्यात ८ जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे़

ठळक मुद्दे प्लेज फॉर लाइफ अभियान : तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीआठ जिल्ह्यांतील २५ हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय अर्थात आठवी ते दहावीतील चारपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन असल्याची गंभीर बाब नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे़ या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात़ तंबाखूच्या व्यसनापासून विद्यार्थी दूर राहावेत यासाठी ‘प्लेज फॉर लाईफ’ हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले असून, त्यात ८ जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली आहे़

महाराष्ट्रातील सुमारे २६ लाख विद्यार्थी या तंबाखूविरोधी मोहिमेचे संदेश दूत बनले असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१७ (गेट्स) नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे (२़४) अडीच कोटी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये दोन कोटी लोक हे तोंडावाटे तंबाखुचे सेवन करतात तर ४० लाख धुम्रपान करणारे आहेत़ त्यांच्या व्यसनाचा परिणाम व्यसनकर्त्याप्रमाणे निर्व्यसनी लोकांच्या आरोग्यावर होतो़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाºया आजारांमुळे महाराष्ट्रात ४५ हजार लोकांचा मृत्यू होतो.

शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि संबंध हेल्थ फाउंडेशनतर्फे ‘प्लेज फॉर लाईफ’ हे राष्ट्रीय अभियान राबविले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना तंबाखूविरोधी माहितीपट दाखवून जागृती केली जात आहे. सोबत तंबाखूविरोधी सामूहिक शपथ घेत आपली शाळा आणि समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते.२६ लाख विद्यार्थी संदेशदूत‘प्लेज फॉर लाईफ’ या अभियानानुसार जळगाव(८ लाख ५१ हजार ९४७), अकोला (२ लाख ३७ हजार), अमरावती (३ लाख ८० हजार), नागपूर(२ लाख ४ हजार), चंद्रपूर (१ लाख ९७ हजार १९२), बुलढाणा (१ लाख ४० हजार २७५) तर वर्धा (७६ हजार ९८४) विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची तंबाखू विरोधी मोहीम आखण्यात आली असून शपथ घेतलेले २६ लाख विद्यार्थी या मोहिमेचे संदेश दूत असणार आहेत.महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूच्या आहारीशालेय विद्यार्थ्यांपैकी आठवी ते दहावीच्या एकूण ४ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यास तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असते. तर गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात प्रतिदिन ५३० मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करीत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे़ 

सुरक्षित व तंबाखुमुक्त विद्यार्थ्यांसाठी अभियान

राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून तंबाखूच्या व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी शिक्षक आणि विध्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित त्यांची एक साखळी निर्माण केली जाणार आहे. लहान वयातील मुलांपासून जागृती केली जाणार असून विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहावेत यासाठी त्यांना माहिती दिली जाणार आहे. सुरक्षित व तंबाखुमुक्त विद्यार्थ्यांसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने तंबाखू सेवन विरोधी संदेशाबाबत जनजागृती केली जाईल़- विशाल सोळंखी,आयुक्त, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य़

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकSchoolशाळा