शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने ग्रस्त बालिकेवर घरीच उपचाराची वेळ

By admin | Updated: October 19, 2014 16:50 IST

डेंग्यूने ग्रस्त बालिकेवर घरीच उपचाराची वेळ

मालेगाव : तालुक्यातील निमगुले येथील जयश्री सुनील कदम या बारावर्षीय मुलीस डेंग्यूची लागण झाली आहे. एकीकडे येथील सामान्य रुग्णालयात मुलीच्या आजाराचे योग्य निदान झालेले नाही, तर दुसरीकडे खासगी रुग्णालयातील औषधोपचार व खर्च परवडत नसल्यामुळे पैशांअभावी या मुलीवर सध्या घरीच औषधोपचार करण्याची वेळ तिच्या पालकांवर येऊन ठेपली आहे.सदर मुलीचे पालक हे अशिक्षित असून, त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे. त्यांना खासगी रुग्णालयातील मुलीचा औषधोपचार परवडेनासा झाला आहे. दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी आशास्थान असलेल्या सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ असल्यामुळे मुलीच्या पालकांनी तिच्यावर घरीच औषधोपचाराचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या मुलीची प्रकृती ही गंभीर आहे. यासंदर्भात निमगुले गाव ज्या मळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येते त्या केंद्राच्या आरोग्य कारभाराविषयीदेखील मुलीच्या पालकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात येथील सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधला असता संबंधितांनी याप्रश्नी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. तसेच ज्या लॅबमध्ये या मुलीचे रक्त-लघवी तपासण्यात आली त्यांनी सदर मुलीस डेंग्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तशी मुलीच्या वैद्यकीय अहवालात नोंदही आहे. सध्या मुलीची तब्येत गंभीर असून, तिच्यावर योग्य ठिकाणी उपचार होणे गरजेचे आहे. याबाबत शासकीय अशा येथील सामान्य रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)