पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:16 IST2020-01-25T22:36:58+5:302020-01-26T00:16:26+5:30

राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.

Time to give up crops without water | पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

ठळक मुद्दे राजापूर परिसरात विहिरींनी गाठला तळ ; पाणीटंचाईचे संकट गडद; भटकंती सुरू

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील व डोंगराळ भागात असलेल्या राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.
पाण्याअभावी शेतात उभी पिके सुकू लागली आहेत. राजापूरला दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही विहिरींना एक ते दोन फुटांपर्यंतच फक्त पाणी येत आहे. एक ते दोन फूट पाण्यामध्ये पिकाला किती पाणी भरायचे व घरी किती वापरायचे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या कोबी, फ्लॉवर व गहू, हरभरा पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रोपे खराब झाल्याने कांदा लागवड कमी प्रमाणात झालेली आहे. त्यात हवामान बदलामुळे औषध फवारणीचा खर्च भरमसाठ झाला आहे. मात्र पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकºयांनी सतावत आहे.
राजापूर हे गाव तालुक्यातील सर्वात उंच डोंगराळ भागात असल्याने दरवर्षी या गावाला कितीही पाऊस झाला तरी
जानेवारी व फेब्रुवारीपासून विहिरी तळ गाठतात. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली असून, पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ आली
आहे.
- विठ्ठल वाघ,
शेतकरी

Web Title: Time to give up crops without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.