नाशिक : चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील सोमठाणे रोडवरील कवडे वस्ती येथील प्रगतीशील शेतकरी कैलास सूर्यभान कवडे (३६) यांचा बुधवारी (दि. ९) पहाटे ६.१५ वाजता अंगावर वीज पडून मृत्यू झाला. रविवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू होता. अचानक विजेच्या कडकडाटाचा आवाज सुरू झाला. कैलास सूर्यभान कवडे हे कांदे व जनावरांचा चारा झाकण्यास बाहेर गेले असता अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील सूर्यभान देवराम कवडे, आई, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या बहिणीचे येत्या १६ मार्च रोजी लग्न होते. त्यापूर्वीच भावावर नियतीने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त समजताच चांदवडचे पोलीस कर्मचारी भाऊलाल हेंबाडे, प्रवीण थोरात घटनास्थळी गेले. त्यांनी तातडीने पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बहिणीच्या विवाहापूर्वीच भावावर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 01:48 IST