नाशिकमध्ये कॅप्टनच्या वृद्ध पत्नीला उपोषणाची वेळ
By श्याम बागुल | Updated: August 28, 2018 14:30 IST2018-08-28T14:28:28+5:302018-08-28T14:30:50+5:30
कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात आली होती. मात्र आदेशानुसार नियमानुसार

नाशिकमध्ये कॅप्टनच्या वृद्ध पत्नीला उपोषणाची वेळ
नाशिक : पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीने मुलासह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात आली होती. मात्र आदेशानुसार नियमानुसार पेन्शन दिली गेली नाही. नियमानुसार १५ हजार ४६५ रुपये पेन्शन असताना बँकेकडून ३ हजार ३३६ रुपये पेन्शन देण्यात येत होती. मंडोधरा कापडणीस यांनी तक्रार केल्यानंतर बँकेने चूक मान्य करीत २०१२ मध्ये बँकेने ६ लाख ३६ हजार ७२३ रुपये फरक म्हणून टप्प्याटप्प्याने २०१७ पर्यंत दिला. फरकाची रक्कम ११ लाख २६ हजार ७६४ असल्याचे कापडणीस यांचे म्हणणे आहे. त्यानंतर जास्त पैसे दिले गेलेत म्हणून बँकेने कापडणीस यांच्या पेन्शनमधून ८ हजार ४०० रुपयांची दरमहा कपात करण्यास सुरुवात केली. कापडणीस यांनी पुन्हा तक्रार केल्यानंतर कपात केलेली रक्कम बँकेने पुन्हा परत केली. बँकेच्या या घोळामुळे पेन्शनची तफावतीची कागदपत्रे बँकेकडे मागितली असता बँकेने देण्यास टाळाटाळ केली आहे. ही कागदपत्रे मिळावीत म्हणून मंडोधरा कापडणीस आणि त्यांचा मुलगा विजय कापडणीस हे दोघे मायलेक बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर सोमवारपासून उपोषण बसले आहे. सैन्यदलातील अधिका-याच्या मृत्यूनंतर पत्नीला अशाप्रकारे संघर्ष करावा लागत असल्याची प्रतिक्रिया मंडोधरा कापडणीस यांनी व्यक्त केली आहे. तर ही न्यायालयीन बाब असून न्यायालयाकडून कागपत्रे घ्यावीत, असे बँकेच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.