शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराला निघताना घरातूनच डबा असायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:01 IST

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, पैशाचा असो, वातावरणाचाही फरक आहेच.

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु ह्या निवडणुकीपेक्षा १९६७ सालापासूनच्या निवडणुकांचा अनुभव घेतला आहे. मग त्या वॉर्डाच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत. आत्ताच्या आणि पूर्वीच्या निवडणुकीत केवढा फरक आहे. मग तो कार्यकर्त्यांचा असो, पैशाचा असो, वातावरणाचाही फरक आहेच. मला कै . दादासाहेब वडनगरे विरुद्ध कै. गणपत काठे यांची विधानसभेची निवडणूक आठवते. घरून जेवणाचे डबे घ्यायचे, ज्या भागात आमचा प्रचार सुरू असे त्या भागातील कार्यकर्त्यांच्या घरी थांबून सर्वजण एकत्र जेवत असू आणि जेवण म्हणजे अवघे ३० मिनिटात होत असे. कारण सर्व लक्ष प्रचार करून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल याकडे असायचे. शिवाय आम्हा महिलांना घरची जबाबदारी होतीच. मुले लहान होती. ते सर्व सांभाळून प्रचार करणे यातही आनंद होता. मला आठवते डॉ. दौलतराव आहेरांची आमदारकीची निवडणूक झाली व ते प्रथमच निवडणुकीला उभे राहून चांगल्या फरकाने निवडूनही आले. त्यानंतर मंत्रिमंडळ, खातेवाटप याविषयी आमच्या कुटुंबात चर्चा चालू होती. आरोग्यमंत्री डॉ. आहेरांनाच करावे, कारण त्यांचे शिक्षण, कामाचा आवाका आणि इतर अनेक कारणे होती. आमचे घर म्हणजे ‘पक्ष कार्यालयच’ असायचे. कै . बंडोपंत जोशी यांनी स्व. प्रमोद महाजनांना फोन केला की डॉ. आहेरांनाच आरोग्यमंत्री करावे. त्यावेळेस ही नेतेमंडळी सहज फोनवर उपलब्ध असत. स्व. प्रमोदजी, स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्याशी आमचे घरगुती संबंध होते. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्याकडेच मुक्कामाला असत. स्व. गणपतराव काठे यांची आमदारकीची निवडणूक आठवते. गणपतरावांनाच तिकीट मिळावे म्हणून त्यांची प्रांतातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू होती, तळ्यात-मळ्यात सुरू होते. आम्हाला पुण्याला निघायचे होते, कारण दोन दिवसांनी पुण्यात आमच्या मुलीचे लग्न होते. कै . गणपतराव काठेंना विधानसभेचे तिकीट मिळाले व ते निवडूनही आले. मुलीच्या लग्नकार्यापेक्षा बंडोपंतांचे लक्ष निवडणुकीकडे अधिक होते. निशिगंधा मोगल, प्रा. मंगला सवदीकर, प्रा. विद्युलता गद्रे, शोभाताई आहेर, अलकाताई आहेर, चंद्रकला जोशी, तिवारीभाभी अशा अनेक नव्या-जुन्या मैत्रिणी होत्या. पण आम्हा महिलांची काळजी घेणारेही तेवढेच समर्थ कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्हाला घरी येण्यास उशीर झाला तरी घरची मंडळी निर्धास्त असायाची.मंगला प्रभाकर जोशी

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNashikनाशिक