शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:18 PM

महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देइंदिरानगर : अपुरा, कमी दाबामुळे कृत्रिम टंचाई

इंदिरानगर : महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.सुमारे दहा दिवसांपासून इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी या भागात अपुºया दाबाने तसेच कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा अद्याप सुरू झालेला नसतानाच तत्पूर्वी कृत्रिम पाणीटंचाई सुरू झाल्याने काही सोसायट्यांतील नागरिकांना लोकवर्गणी काढून खासगी टॅँकरद्वारे पाण्याची तहान भागवावी लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात मुबलक पाणी असतानाही निव्वळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय असल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून नासर्डी ते पाथर्डी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यासाठी पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या वॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते. परंतु काही दिवसांतच या वॉल्व्हचे कुलूप काढण्यात आले व पाण्याची पळवापळवी सुरू झाली.बैठका घेऊनही : समस्या कायमगेल्या प्रभाग सभेत नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांसह सर्व सदस्यांनी प्रभागाच्यापाणीप्रश्नावरून ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त व पाणीपुरवठा अधिकाºयांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात आयुक्त व महापौरांसमवेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बैठका घेतल्या तरीदेखील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातnmmcनवी मुंबई महापालिका