Tiger is becoming dangerous near college | वाघ महाविद्यालयानजीक रस्ता बनतोय धोकादायक
वाघ महाविद्यालयानजीक रस्ता बनतोय धोकादायक

आडगाव : सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजच्या समोरील अरुंद रस्त्यालगत असलेली कॉलेजजवळील अनधिकृत पार्किंग, कॉलेजच्या शेजारी असलेल्या सायकल शेयरिंगमुळे येथील रस्त्यावर उभे राहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नसल्याची स्थिती निर्माण झाली. तसेच या रस्त्याचे रुंदीकरण करून कॉलेजजवळील उघडा नाला बंदिस्त करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व स्थानिकांनी केली आहे.
सरस्वतीनगर येथे मोठी नागरी वसाहत असून, या रस्त्यावर प्रमोद महाजन उद्यान तसेच अनेक व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे के. के. वाघ शिक्षण संस्थेची शाळा, कॉलेज आहे. हजारो विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेतात.
या रस्त्यावर अनेक वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्यामुळे रस्त्यावर चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईदेखील केली, परंतु कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे असल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील नाला बंदिस्त करून या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.


Web Title:  Tiger is becoming dangerous near college
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.