अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:16 IST2021-08-23T04:16:38+5:302021-08-23T04:16:38+5:30

खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक ...

Tied to the fire brigade | अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधल्या. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. अग्निशामक दलाचे काम फक्त आग आटोक्यात आणणे असे आम्हांला वाटायचे. पण जेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हांला काही घटना सांगितल्या, त्या अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या, असे तालुका अध्यक्षा हेमलता मानकर यांनी सांगितले.

यावेळी मालेगाव शहर अध्यक्षा सुचित्रा सोनवणे, वैशाली मोरे, प्रतिभा घुसर, तेजस्विनी गवळी आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

220821\img-20210821-wa0021.jpg

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फ़े अग्निशमन दलाच्या जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करतांना तालुका अध्यक्ष हेमलता मानकर, सुचित्रा सोनवणे, वैशाली मोरे, प्रतिभा घुसर, तेजस्विनी गवळी आदी महिला पदाधिकारी

Web Title: Tied to the fire brigade