शनि जयंतीनिमित्त मंदिरांत गर्दी

By Admin | Updated: May 29, 2014 01:11 IST2014-05-29T01:09:49+5:302014-05-29T01:11:49+5:30

नाशिक : शनि जयंतीनिमित्त शहरातील शनि मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त ठिकठिकाणी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले, तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Thunderstorms in the Shani Jayanti | शनि जयंतीनिमित्त मंदिरांत गर्दी

शनि जयंतीनिमित्त मंदिरांत गर्दी

नाशिक : शनि जयंतीनिमित्त शहरातील शनि मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्त ठिकठिकाणी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले, तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहरात भद्रकाली कारंजा, पंचवटीतील शनि चौक, इंदिरानगर, देवळाली गाव, रविवार पेठ, सिडको आदि ठिकाणी शनि मंदिरे असून, शनि जयंतीनिमित्त ती सकाळपासूनच गजबजून गेली होती. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या मंदिरांत पहाटेपासूनच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता अभ्यंगस्नान, रुद्राभिषेक, शनि प्रतिमेची मिरवणूक, सत्यनारायण पूजन, महाप्रसाद वाटप आदि कार्यक्रम झाले. देवळालीगाव येथील शनि मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. शनि चौकात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार पेठेतील मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ११ किलो वजनाचा चांदीचा शनि मुखवटा रामकुंडावर नेऊन, त्याला स्नान घालण्यात आले. त्याची विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी ११ वाजता विश्वशांतीसाठी शनियाग करण्यात आला. सायंकाळी पूर्णाहुती व जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. तसेच रथयात्रा काढण्यात आली.

विक्रेत्यांची गर्दी
शनिदेवाला रुईच्या पानांची माळ व तेल वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे शनि जयंतीनिमित्त मंदिरांच्या परिसरात रुईच्या पानांची माळ, सुटे तेल विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. छोट्या बाटल्यांमधून तेलाची विक्री केली जात होती. त्याच्यासह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती.

Web Title: Thunderstorms in the Shani Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.