देवनदीला महापूर

By Admin | Updated: September 19, 2015 22:22 IST2015-09-19T22:21:20+5:302015-09-19T22:22:19+5:30

देवनदीला महापूर

Thunderstorms to Devdadi | देवनदीला महापूर

देवनदीला महापूर


पांडाणे : गेल्या दहा वर्षांपूर्वी देवनदीला आलेल्या महापुराची पुनरावृत्ती शुक्रवारी पांडाणेत पुन्हा झाली. जोरदार पावसामुळे त्यावेळे-पेक्षा शुक्रवारी नदीला तब्बल दुप्पट पाणी होते, तर वणी-सापुतारा पुलालाही पुलाचे पाणी लागले होते. शुक्र वारी पहाटे ३ वाजल्यापासून देव नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी पडणाऱ्या पावसामुळे नदीला पूर येईल, अशी शक्यताही ग्रामस्थांच्या मनात नव्हती. मात्र थोड्याच वेळात नदीने महारौद्ररूप धारण केले. २५ ते ३० फूट उंच वणी - सापुतारा रस्त्यावरील पुलाला पुराचे पाणी लागले आणि गावालगतची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली.
 

Web Title: Thunderstorms to Devdadi