गाडीची काच फोडून चोरट्याने केला साडेआठ लाखांचे दागीने रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 15:25 IST2019-12-22T15:24:51+5:302019-12-22T15:25:18+5:30
घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे.

गाडीची काच फोडून चोरट्याने केला साडेआठ लाखांचे दागीने रोकड लंपास
घोटी : मुंबई येथील पर्यटन आण िदेवदर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील इर्टीगा कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी भावली धरण परिसरात ८ लाख ७१ हजारांचा सोने आणि रोख ऐवज लुटला आहे.
शुक्र वारी दुपारी ४ वाजता भावली धरण भागात ही घटना घडली. या घटनेबाबत इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदीवली कल्याण येथील अलोक अशोक बगाडे हे पत्नी सुनीता, मुलगी सुप्रिया, सासू तानुबाई केंग, लिलाबाई किर्वे, गोकुळ रंधवे, सुप्रिया गोकुळ यांच्यासह इर्टीगा कार (एम एच ०५ सीएम ०६६७) मधून इगतपुरी तालुक्यात पर्यटन आणि देवदर्शन करण्यासाठी आले होते.
त्यांच्या घराच्या भागात वारंवार चोऱ्या होत असल्याने घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम त्यांनी कारमध्ये ठेवली होती. अडसरे येथे नातेवाईकांकडे मुक्काम करून दुपारी ४ वाजता ते इगतपुरी जवळील भावली धरण भागात गाडी लॉक करून फिरण्यासाठी गेले.
तासाभराने परत आल्यानंतर त्यांच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी सर्व मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास केल्याचे आढळले. सोने, चांदी, रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७१ हजार रु पयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याबाबत अलोक बगाडे यांनी इगतपुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे विनोद गोसावी आणि सहकारी तपास करीत आहेत.