आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:11 IST2020-03-19T22:01:00+5:302020-03-20T00:11:16+5:30

येवला तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखेरच्या घटका मोजत आहे.

In the throes of health epicenter problems | आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत

आरोग्य उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत

ठळक मुद्देदुर्लक्ष : सायगाव येथे आरोग्य कर्मचारी नसल्याने गैरसोय

सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात गेल्या चार वर्षांपासून आरोग्यसेवक व सेविकेची नियुक्ती नसल्याने इमारत व प्रसूतीगृहाला मरणकळा सोसाव्या लागत आहे. इमारतीची झालेली पडझड व घाणीचे पसरलेले साम्राज्य यामुळे येथील आरोग्य उपकेंद्रच अखेरच्या घटका मोजत आहे.
पाच हजार लोकसंख्या असलेल्या सायगावमध्ये गेल्या तीस वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सेवा सुरू होती. गरजेपुरती पुरेशी आरोग्य उपकेंद्राची इमारत, स्वतंत्र प्रसूतीगृह उभारण्यात आले आहे. पूर्वीपासून निवाशसी वैद्यकीय सेवक, नर्स यांचे वास्तव्य या इमारतीत असायचे. गेला चार वर्षांपूर्वी येथील आरोग्य सेविका सेवानिवृत्त झाल्या, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधींसह आरोग्य प्रशासनाने आरोग्य कर्मचारी नियुक्त केले नाही.
येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण झालेली आहे. पावसाळ्यात गळणारे छत व कर्मचारी राहत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या जीर्ण इमारतीला एक वर्षांपूर्वी रंगरंगोटी करून दुरुस्तीच्या नावाखाली लाख दोन लाखांचा निधी खर्ची करण्यात आला. त्यामुळे वरून कीर्तन आतून तमाशा अशीच गत सायगावच्या आरोग्य उपकेंद्र इमारची झाली आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून आरोग्यसेवकांची नेमणूक करण्यात यावी यासाठी वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केली होती. ग्रामपंचायतीने येवला पंचायत समिती, जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीं यांची बेफिकिरी की, प्रशासनाची उदासीनता असा प्रश्न सायगावकरांना पडला आहे.

प्रसूतीगृह धूळखात पडून !
दहा वर्षांपूर्वी येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वतंत्र प्रसूतीगृहाची इमारत बांधण्यात आली. आजपर्यंत या प्रसूतीगृहात एकाही महिलेची प्रसूती झाल्याची नोंद नाही. सुरवातीच्या दोन वर्षांत या प्रसूतीगृहात तलाठी कार्यालय थाटले होते. गेल्या चार वर्षांपासून निवासी वैद्यकीय सेवक नसल्याने या प्रसूतीगृहातील साधनसामुग्री धूळ खात पडून आहे. अस्ताव्यस्थ पडलेले सामान व भीती, छताला लागलेले जाळे, धूळ ही अनेक वर्षांपासून पडीत वास्तू असल्याची साक्ष देत आहे.

Web Title: In the throes of health epicenter problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.