नाशिक : पूर्व वनविभागाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करत खैर वृक्ष प्रजातीची अवैधरीत्या कत्तल करून तोडलेला खैर लाकडाचा साठा उंबरठाण वनपरिक्षेत्रातील जंगलातून लांबविला जात असल्याची गुप्त माहिती प्रादेशिक वनविभागाला मिळाली. यानुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचून हाडकाईचोंडजवळील पांगारणे शिवारात खैराची अवैध वाहतूक रोखली. तोडलेल्या लाकूडसाठ्यासह गुजरातची तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच्या सीमेला लागून आहे. यामुळे सातत्याने दऱ्याखोऱ्यातील चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतात. काही दिवसांपूर्वीच नाशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात वनविभागाच्या सापुतारा, डांग, कपराडा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांसोबत 'बॉर्डर मीटिंग' घेत जंगलतोड करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी एकमेकांना संयुक्तरीत्या मदत करत 'ॲक्शन प्लॅन' राबिवण्याचा निर्धार केला. या बैठकीला आठवडा होत नाही, तोच उंबरठाण वनपरिक्षेत्रात तस्करांनी घुसखोरी करत खैराच्या झाडांवर घाव घातला. तोडलेला खैर गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा मनसुबा वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व त्यांच्या पथकाने उधळून लावला. चोखपणे रात्रीची गस्त घालत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून शिताफीने अवैधरीत्या खैर वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या वाहनांना 'ब्रेक' लावला. पथकाने मौजे पांगारणे शिवारात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या भरधाव जाणारी मॅक्स जीप (जीजे ०६ बीए६१३८), दोन क्वालिस कार (जीजे२१ ५९६४) व (जीजे१९ ए ४४१४) रोखल्या. या वाहनांमधून सहा हजार ८६२ रुपये किमतीचे खैराचे एकूण १७ नग जप्त करण्यात आले. तसेच तीनही वाहनांसह सुमारे २ लाख ७६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल वनविभागाच्या पथकाने या कारवाईत जप्त केला आहे.
उंबरठाण : सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली; गुजरातची तीन वाहने ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 20:36 IST
महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात सातत्याने खैर, साग तस्करांची घुसखोरी नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील जंगलांत सुरू असते. हरसुल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण, बारे ही वनपरिक्षेत्र याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. या वनपरिक्षेत्रांची हद्द गुजरातच्या सीमेला लागून आहे. यामुळे सातत्याने दऱ्याखोऱ्यातील चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतात.
उंबरठाण : सीमावर्ती भागात खैराची अवैध वाहतूक रोखली; गुजरातची तीन वाहने ताब्यात
ठळक मुद्देसातत्याने चोरट्या वाटेने तस्कर टोळ्या घुसखोरी करतातगुजरात वनविभागाच्या तपासणी नाक्यांनाही 'ॲलर्ट'