मेसनखेडे खुर्द येथील तीनवर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:11 IST2019-07-26T00:10:25+5:302019-07-26T00:11:30+5:30
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील शेत गट नंबर ३४१ या सामाईक शेतातील विहिरीत साहील भारत ससाणे (३) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मेसनखेडे खुर्द येथील तीनवर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील शेत गट नंबर ३४१ या सामाईक शेतातील विहिरीत साहील भारत ससाणे
(३) या बालकाचा बुडून मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी (दि. २४) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे बालक विहिरीत पडले. त्याला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे मदतकार्यातही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. त्याचा मृतदेह सायंकाळी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणून उत्तरीय तपासणीनंतर बालकाचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.
याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार नरेंद्र सौंदाणे करीत आहेत. चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.