शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

उत्कृष्ट वनसंवर्धनात तीन गावांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:55 AM

वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय स्पर्धा : संत तुकाराम वनग्राम योजनेचे बक्षीस जाहीर; गवळीपाडा प्रथम, गोंदुणे द्वितीय

नाशिक : वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पूरक अशी कामे करून वन्यजिवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासना करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. संत तुक ाराम वनग्राम योजनेअंतर्गत गवळीपाडा, गौंदुने, श्रीघाट या गावांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याची माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसहभागातून वनविकास साधताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन-वन्यजीव संवर्धनाकरिता पूरक ठरणारे उपक्रम राबवून २०१७-१८ या वर्षासाठी तीन गावे संत तुकाराम वनग्राम योजनेत विजयी ठरली.पश्चिम वनविभागातील ननाशी वनपरिक्षेत्रात असलेल्या मौजे गवळीपाडा (महाजे) येथील वनव्यवस्थापन समितीने २०११-१२ सालापासून ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी, कुºहाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. वनपरीक्षेत्र अधिकारी रविंद्र भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव वनपाल आर.व्ही.देवकर, वनरक्षक हिरामण चौधरी यांनी लोकसहभागातून २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रुपयांचे बक्षीस, तर सुरगाणा तालुक्यातील गोंदुने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट आदिवासी पाड्यांच्या समित्यांना अनुक्रमे ३१ हजार (द्वितीय), ११ हजारांचे (तृतीय) बक्षीस वनविभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.आज बक्षीस वितरणसंत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत विजयी झालेल्या गावातील समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जाहीर समारंभात बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. उंटवाडी येथील वनविश्रामगृह येथे बक्षीस वितरणाचा सोहळा बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता पार पडणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकारforestजंगल