शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाहनांचा अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:11 IST

सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात शहापूरजवळ रविवारी (दि.२३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी महामार्ग : दातलीत तीन महिलांसह चार जखमी

सिन्नर-शिर्डी महामागार्वर दातली शिवारात झालेल्या अपघातातील चक्काचूर झालेली कार व गॅस कंटेनरसिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात शहापूरजवळ रविवारी (दि.२३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत. अपघातात गॅस कंटेनर, असेंट कार व स्विफ्ट डिझायर कार या वाहनांचा समावेश असून त्यात असेंट कारचा चक्काचूर झाला आहे.सिन्नर - शिर्डी महामार्गावरील दातली फाट्याजवळील शहापूर येथील रामेश्वर लॉन्सजवळ सदरचा अपघात घडला. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अपघातात असेंट कारमधील चालक प्रवीण सोना जाधव (३२) रा. समतानगर नाशिक हे मृत्युमुखी पडले. तर त्याच कारमधील वंश राजेश नेभवाणी (१८), शिलू राजेश नेभवानी (४५), क्रशा राजेश नेभवानी व लता मुरलीधर कृष्णाणी (६०) सर्व राहणार ड्रिम फ्लॉवर, टाकळी रोड, नाशिक हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधर गुरूळे, लक्ष्मण बदादे, किशोर सानप, आबा शेळके आदी पुढील तपास करीत आहेत.अपघातात कारचा चक्काचूरसकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शिर्डीकडून सिन्नरकडे येणारा गॅस कंटेनरने (क्र. एम. एच. ०४ जे. के. १६७८) त्याच दरम्यान सिन्नरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार (क्र. एम. एच. १५ ई. पी. ८४९७) ला धडक दिली. स्विफ्टकारच्या पाठीमागून येणाºया असेंट कार (क्र. एम. एच. १५ ई. पी. १८०७) ला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तसेच क्रेन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात