शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

नाशकात आढळले तीन हजार कोरोनाबधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:51 PM

नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, मंगळवारी (दि.१३) संपूर्ण जिल्ह्यात तीन हजार ३४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

ठळक मुद्दे२,२३४ संशयित दाखल : ४ हजार २१ रुग्णांची कोरोनावर मात

नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, मंगळवारी (दि.१३) संपूर्ण जिल्ह्यात तीन हजार ३४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी नाशिक शहरांमध्ये १ हजार ८५३, तर ग्रामीण भागात १ हजार ३६९ आणि मालेगाव महापालिका हद्दीत १११ नवे रुग्ण सापडले. दिवसभरात एकूण ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४,०२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरामध्ये नाशिक महापालिका आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच पोलीस प्रशासनदेखील रस्त्यावर उतरले आहे. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी अद्यापही काही नागरिक सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावताच वावरत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांवरदेखील निर्बंध लावण्यात आलेले आहे. तसेच धार्मिक सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांवर ही बंदी घालण्यात आली आहे; मात्र अजूनही नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.नाशिक शहरात आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांचा आकडा १ लाख ४५ हजार ६५ इतका झाला आहे, तर जिल्ह्यात २ लाख ३६ हजार ९७२ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. शहरात १ हजार २८१ रुग्ण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत, तर जिल्ह्यात बळींचा आकडा २ हजार ७५२ इतका झाला आहे. यामध्ये मालेगावात आतापर्यंत २२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाबाह्य ८८ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत. एकूण ८ हजार ४२८ कोरोना नमुना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये शहरातील ३ हजार ६५३ अहवालांचा समावेश आहे. दिवसेंदिवस प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात २ हजार २३४ नवे संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या