नाशिक : पायी जात असलेल्या तरुणास तिघांनी बेदम मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारी पंचवटीतील अमरधामजवळ घडली़ या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळीतील गीताईनगरमधील रहिवासी दुर्योधन कोंगे हा दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास पंचवटीतील अमरधामसमोरील रस्त्याने पायी जात होता़ त्यावेळी समोरून आलेल्या तिघा संशयितांनी केंगे यास अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ यापैकी एकाने हातातील फायटरने नाकावर व कपाळावर मारल्याने केंगे यांचे हाड फ्रॅक्चर झाले़ दरम्यान, या झटापटीत कोंगे याच्या खिशातील दहा हजार रुपये पडून गहाळ झाले़याप्रकरणी जखमी कोंगे यांची बहीण लता पवार यांनी फिर्याद दिली आहे़ दरम्यान, पंचवटीत मारहाण व लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांनी या भागात गस्त वाढविण्याची टोळक्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़
तिघा संशयितांकडून युवकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:55 IST
पायी जात असलेल्या तरुणास तिघांनी बेदम मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारी पंचवटीतील अमरधामजवळ घडली़ या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
तिघा संशयितांकडून युवकास बेदम मारहाण
ठळक मुद्देपंचवटी : तिघांविरोधात गुन्हा दाखल