शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:40 IST

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले

एकलहरे : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील  एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता.कोळशाची उपलब्धता, विजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीनपैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावॅट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरू ठेवून संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र आता उन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीनदेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेयधोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते.१० जानेवारी २०१९ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकच संच कार्यान्वित होता. विजेच्या वाढत्या मागणीमुळे दिनांक २८ मार्च रोजी सकाळी २१० मेगावॅटचा संच क्रमांक ५ संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला व तीनपैकी दोन संच सुरू झाले होते. यापूर्वी कमी विजेच्या मागणीमुळे सदर संच संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हते, तसेच इतर संच उपलब्ध असूनसुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने एक किंवा दोन संच चालू असायचे, परंतु आता मात्र तिन्ही संच बऱ्याच दिवसांनी पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत.  - उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे केंद्र

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकPower Shutdownभारनियमन