मुंबईतील पावसामुळे तीन रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:18 IST2019-07-02T01:18:27+5:302019-07-02T01:18:45+5:30

मुंबई परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे गोदावरी, पुणे-भुसावळ व भुसावळ-मुंबई पॅसेंजर या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या. तर मुंबईहून येणाऱ्या-जाणाºया रेल्वे पावसामुळे उशिराने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले.

 Three railway trains canceled due to Mumbai's rains | मुंबईतील पावसामुळे तीन रेल्वे गाड्या रद्द

मुंबईतील पावसामुळे तीन रेल्वे गाड्या रद्द

नाशिकरोड : मुंबई परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे गोदावरी, पुणे-भुसावळ व भुसावळ-मुंबई पॅसेंजर या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या. तर मुंबईहून येणाऱ्या-जाणाºया रेल्वे पावसामुळे उशिराने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले.
सोमवारी सकाळी मनमाडहून सुटलेली गोदावरी एक्स्प्रेस इगतपुरीमध्ये रद्द करून माघारी घेण्यात आली. पुणे-भुसावळ व भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून रद्द करण्यात आली.
उशिराने धावणाºया गाड्या मुंबईहून सुटणारी काशी एक्स्प्रेस ५० मिनिटे, पवन, कामायनी दीड तास, मंगला एक्स्प्रेस अर्धा तास, शताब्दी, फैजाबाद, सेवाग्राम एक्स्प्रेस एक तास, मनमाड शटल, नंदीग्राम दोन तास उशिराने धावत होत्या. तर मुंबईला जाणारी काशी एक्स्प्रेस सहा तास, पुष्पक, भागलपूर एक्स्प्रेस एक तास, गीतांजली अडीच तास, साकेत दोन तास, तपोवन एक्स्प्रेस पाऊण तास, लखनऊ एक तास, कामायनी एक्स्प्रेस या गाड्या चार तास उशिराने धावत होत्या.

Web Title:  Three railway trains canceled due to Mumbai's rains