कृषी उत्पादनासाठी त्रिसूत्रीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:30 IST2020-07-01T23:49:44+5:302020-07-02T00:30:17+5:30
यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर.
नाशिक : यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे कोणे येथे आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह’ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भुसे म्हणाले खरीप हंगामात कोणत्याही जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला अन् त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्या शेतकºयास अर्ज करण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारची यंत्रणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वांचा पोशिंदा बळीराजाच होता. या प्रतिकूल परिस्थितीत अडचणींचा सामना करून शेतकºयांनी सर्वांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला पोहोचविला. १ ते ७ जुलै दरम्यान होणाºया सप्ताहात शेतकºयांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सीताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूदन भारस्कर, विश्वास चव्हाण या शेतकºयांचा सत्कार करण्यात आला.
यांत्रिक पद्धतीने भातलागवड
कार्यक्रमापूर्वी दादा भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. धोंडेगाव येथील कासुबेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
किशोर पवार या शेतकºयाच्या शेडनेडची पाहणी केली. हिरामण ठाकरे या शेतकºयाने उभारलेल्या शेततळे व फळबाग याची पाहणी त्यांनी केली. एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. दादा भुसे यांनी स्वत: चिखलात उतरून मशीनची माहिती जाणून घेतली व भातलागवडदेखील केली.