मालेगावी धुडगुसप्रकरणी आणखी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:31 IST2019-02-05T18:26:56+5:302019-02-05T18:31:09+5:30
मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र धुडगुस घालणाऱ्या अजुन तिघा जणांना पवारवाडी पोलीसांनी अटक केली आहे. यापूर्वी एका अल्पवयीन मुलासह तिघा संशयीवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

मालेगावी धुडगुसप्रकरणी आणखी तिघांना अटक
मालेगाव : शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र धुडगुस घालणाऱ्या अजुन तिघा जणांना पवारवाडी पोलीसांनी
अटक केली आहे. यापूर्वी एका अल्पवयीन मुलासह तिघा संशयीवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. आता या प्रकरणातील अटक झालेल्या संशयीत आरोपींची संख्या सात झाली आहे. अटक केलेल्या तिघांना उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणातील संशयीत आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी दिली. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री गुडांच्या एका टोळक्याने जाफरनगर, मिल्लतनगर, आयेशानगर भागात हातात तलवारी, चॉपर, कोयते अशी तीष्ण हत्यारे घेऊन धुडगुस घातला होता. पाच जणांवर प्राणघातक हल्ला करुन वाहनांची तोडफोड केली होती.
टोळी युद्धातुनच हा प्रकार घडल्याने पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणात पोलीसांना मोहंमद हसन कुरेशी, अनिस अहमद रफीक अहमद, मोहंमद समीन मोहंमद सलीम यांना यापूर्वी अटक केली होती; तर बुधवारी मुज्जमील हुसेन, जुल्फेकार अहमद, मोबीन (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांना अटक केली आहे.