सोयगावी १५ दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:30+5:302021-04-22T04:14:30+5:30

मालेगाव : शहरातील सोयगाव परिसरातील जयरामनगर येथील बच्छाव कुटुंबातील तिघांचे १५ दिवसांत निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून ...

Three members of the same family died in 15 days in Soyagavi | सोयगावी १५ दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सोयगावी १५ दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मालेगाव : शहरातील सोयगाव परिसरातील जयरामनगर येथील बच्छाव कुटुंबातील तिघांचे १५ दिवसांत निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोयगावच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पांडुरंग जयराम बच्छाव यांच्या कुटुंबातील तिघांचे १५ दिवसात निधन झाले. सुमनबाई काशिनाथ बच्छाव (५५) यांचे नाशिक येथे उपचार सुरू असताना २९ मार्चला निधन झाले. त्यानंतर, चारच दिवसांत त्यांचे पती काशिनाथ पांडुरंग बच्छाव (६०) यांचेही ४ एप्रिल रोजी नाशिक येथे निधन झाले. त्यानंतर, आठच दिवसांत त्यांचा लहान मुलगा संदीप काशिनाथ बच्छाव (३३) याचे निधन झाले. यमुनाबाई यांचे सटाणा येथील भाऊ बहिणीला नाशिक येथे दवाखान्यात घेऊन गेल्यामुळे कोरोनाची लागण होऊन त्यांचेही निधन झाले. बच्छाव यांचे भाडेकरू शरद बोरसे यांना कोरोनाची लागण झाल्याने १५ दिवसांनी निधन झाले. मनपा आरोग्य विभागाने या जयरामनगर परिसरात साधी फवारणीसुद्धा केली नाही, तर अधिकारी व नगरसेवक यांनी भेटसुद्धा दिली नाही, असा आरोप बापू बच्छाव यांनी केला आहे. (२१ संदीप बच्छाव, २१ बच्छाव)

===Photopath===

210421\21nsk_9_21042021_13.jpg

===Caption===

२१संदीप बच्छाव, २१ बच्छाव

Web Title: Three members of the same family died in 15 days in Soyagavi