पिंपळगावी तीन लाखांच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 16:14 IST2019-10-03T16:14:39+5:302019-10-03T16:14:47+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरे नगर परिसरातील प्लास्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.

पिंपळगावी तीन लाखांच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरे नगर परिसरातील प्लास्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.
दुकानदारास पाच हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पिंपळगाव ग्रामपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक बंदीची जनजागृती करण्यात आली होती. त्यात नागरिकांचे प्रबोधन देखील करण्यात आले होते. तरीदेखील प्लॅस्टिकची सर्रास विक्र ी होत असल्याने ग्रामपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. यापुढील काळातही प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व विक्र ी करणाºया दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.