तीन कुंडीय गायत्री यज्ञ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:34 IST2019-05-13T00:33:37+5:302019-05-13T00:34:59+5:30

लासलगाव : येथील ९३ नंबर मधील वाघेश्वरी माता मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तीन कुंडीय गायत्री यज्ञ करण्यात आला. यावेळी गायत्री देवी, भगरीबाबा, वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

Three Kundal Gayatri Yagya enthusiasm | तीन कुंडीय गायत्री यज्ञ उत्साहात

तीन कुंडीय गायत्री यज्ञ उत्साहात

ठळक मुद्दे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

लासलगाव : येथील ९३ नंबर मधील वाघेश्वरी माता मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तीन कुंडीय गायत्री यज्ञ करण्यात आला. यावेळी गायत्री देवी, भगरीबाबा, वेदमूर्ती पं. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी शर्मा आचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
रविवारी संध्याकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आलेल्या तीन कुंडीय गायत्री यज्ञामध्ये सागर पारीक, उमा पारीक, प्रतीक चोथानी, खूषमा चोथानी, सागर चोथानी, प्रियंका चोथानी या दाम्पत्यांनी मुख्य यजमान म्हणून सहभाग नोंदविला. किशोर व्यास यांनी पौरोहित्याचे कामकाज बघितले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवीच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा महिला व पुरु ष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
यावेळी ईश्वर पटेल, शिवजी पटेल, ईश्वर शहा, पुरुषोत्तम चोथानी, किशोर व्यास, नीलेश पटणी, गोपी गोर, विजय रावळ, दिनेश पटेल, ब्रिजेश पारीक, कैलास उपाध्ये, बळराम माठा, रोहित पटेल, हरीष शहा, जितेंद्र चोथानी, दलपत पटेल, पंकज ठक्कर, नीलेश शर्मा, हितेश चोथानी, रितेश उपाध्ये, संदीप पांडे, डॉ. मुर्गेश शहा व जय अंबे मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Three Kundal Gayatri Yagya enthusiasm

टॅग्स :Templeमंदिर