वºहाडाची जीप उलटून तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:26 IST2018-03-08T01:26:44+5:302018-03-08T01:26:44+5:30

Three jawans killed in Jeep | वºहाडाची जीप उलटून तीन ठार

वºहाडाची जीप उलटून तीन ठार

ठळक मुद्देसिन्नर : ९ जण जखमी

सिन्नर : विवाह सोहळा आटोपल्यानंतर घराकडे परतणारी वºहाडाची जीप उलटून झालेल्या अपघातात निफाड येथील ३ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. सिन्नर- बारागावपिंप्री रस्त्यावर मंगळवारी हा अपघात झाला. मृतांत पितापुत्राचा समावेश आहे.
निफाडच्या उगाव रस्त्यावर असणाºया बेघर वस्ती येथील मुलीचा विवाह गोंदे फाटा येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. समारंभ पार पडल्यानंतर पिकअपने (एम १४ डीएम ८१५८) वºहाड निफाडकडे परत निघाले होते. सुळेवाडी फाट्याजवळ जीपचा ब्रेक निकामी झाल्याने जीप नाल्यात उलटली. अपघातात संजय सखाराम माळी (४०) रा. बेघर वस्ती निफाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर बापू दगू कराटे (२१) व दगू भास्कर कराटे (५०) या दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघातात भोलेनाथ गोडधे, सुमन माळी, सिंधूबाई पवार, गणेश पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू दिलीप मोरे, अजय पवार, संकेत पवार जखमी झाले आहेत.

Web Title: Three jawans killed in Jeep

टॅग्स :carकार