शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:11 PM

वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.

ठळक मुद्देवन, अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्नरोपवन सुरक्षित असल्याचा दावा

नाशिक : चुंचाळे येथील डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात डोंगराच्या माथ्यावरुन अचानकपणे आग लागली. रात्री दहा वाजेच्या सुमारास डोंगरमाथ्यावर आगीच्या ज्वाला भडकल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलासह वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रांसह एमआयडीसी केंद्राच्या जवानांनी तसेच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तास शर्थीेचे प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यास यश आले.नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम वणवा भडकला होता. या वणव्याची माहिती मिळताच त्वरित नाशिक पश्चिम वनविभागाचे कर्मचारी तसे अग्नीशमन दलाचे जवान आणि ग्रीन रिव्हॅल्युएशन संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी धाव घेतली. डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाला भडकत असून वाळलेले गवत मोठ्या वेगाने जळत असल्याचे लक्षात आले. यावेळी रात्रीच्या किर्रर्र अंधारात वनसंपदा वाचविण्यासाठी जवानांसह वनकर्मचाऱ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. बॅटरीच्या प्रकाशात डोंगर चढत आजुबाजुंच्या झाडांच्या काही फांद्या तोडत त्याची झोडपणी तयार करुन पारंपरिक पध्दतीने आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा ते वीस लोकांनी झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरमाथ्यावर आग भडकलेली असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करणेही अशक्य होते. यामुळे जवानांनी फावडे, टिकाव आदी साहित्याच्या मदतीने गवत काढण्यास सुरुवात केली. वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.रोपवन सुरक्षित असल्याचा दावायेथील टेकडीभोवती असलेल्या रोपवनात सुमारे दहा हजार रोपांची लागवड काही वर्षांपुर्वी करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हॅल्युएशन या स्वयंसेवी संस्थेकडून रोपांची देखभाल केली जात आहे. रोपांची दमदार वाढ झाली असून या रोपवनाला आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र वेळीच वनविभाग व मनपाच्या अग्नीशमन दलाच्या जवानांसह स्वयंसेवकांनी घेतलेल्या संयुक्त परिश्रमामुळे रोपवनाला आगीची झळ बसली नाही. रोपवन सुरक्षित असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलforest departmentवनविभागforestजंगल