घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:46 IST2018-12-20T17:45:22+5:302018-12-20T17:46:32+5:30
मनमाड : शहरात दोन ठिकाणी घरफोडी करणाºया तीन चोरट्यांना मनमाड शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मनमाड शहरात घरफोडी करणाºया तिघा चोरट्यांसमवेत सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. व सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, अझरुद्दीन शेख, प्रल्हाद बनसोडे, राजेंद्र जगताप, सुनील पवार, संदीप वणवे, विशाल सोनवणे, मुदासार शेख.
मनमाड : शहरात दोन ठिकाणी घरफोडी करणाºया तीन चोरट्यांना मनमाड शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी नजराणा सोसायटी मधील दिनेश जनार्दन मोरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. तर दुसºया घटनेत पंचवटी कॉलनीतील विजय सोमिते यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५३ हजार रु पयांचा ऐवज चोरु न नेला. या दोन्ही घटनेबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धूसर यांच्या पथकाने या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी चक्रे फिरवली. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना सापळा रचून अटक केली. यामध्ये सागर यशवंत गरुड, अभिराज लक्ष्मण उबाळे, सचीन अंबादास पगारे तिघे रा. मनमाड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील दोन्ही घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ऐवजा पैकी ७० हजार ७०० रु पयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, अझरुद्दीन शेख, प्रल्हाद बनसोडे, राजेंद्र जगताप, सुनील पवार, संदीप वणवे, विशाल सोनवणे, मुदासार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.