नांदूरमधमेश्वरचे तीन दरवाजे उघडले
By Admin | Updated: August 1, 2016 01:36 IST2016-08-01T01:35:20+5:302016-08-01T01:36:42+5:30
सतर्कतेचा इशारा

नांदूरमधमेश्वरचे तीन दरवाजे उघडले
निफाड: रविवारी (दि. ३१) गंगापूर आणि दारणा धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर सायंकाळी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात हे पाणी पोहोचले असून रात्री नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ४८४२ क्यूसेक पाणी बंधाऱ्याच्या तीन दरवाजातून सोडण्यात आले आहे. रविवारी गंगापूर धरणातून २७४० क्यूसेक पाणी, तर दारणा धरणातून सकाळी ५१६० क्यूसेक व सायंकाळी ३९५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे निफाड तहसील प्रशासनाने गोदावरी किनाऱ्यावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पाणी पोहोचले. या बंधाऱ्यातून दि. ३१ पर्यंत एका दरवाजातून गोदावरी नदीत १६६४ क्यूसेक, तर डाव्या कालव्यात १०० क्यूसेक व उजव्या कालव्यात १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग दि. ११ जुलैपासून चालू होता; मात्र गंगापूर व दारणा धरणाचे पाणी या बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर रात्री या बंधाऱ्याचे अजून दोन दरवाजे उघडण्यात येऊन एकूण ४८४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.