उल्लेखनीय कार्याबद्दल तिघा डॉक्टरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST2017-10-27T23:57:51+5:302017-10-28T00:11:56+5:30

शहरातील निमा न्यू नाशिक व फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिघा डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

Three doctors felicitated for remarkable work | उल्लेखनीय कार्याबद्दल तिघा डॉक्टरांचा सत्कार

उल्लेखनीय कार्याबद्दल तिघा डॉक्टरांचा सत्कार

नाशिक : शहरातील निमा न्यू नाशिक व फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिघा डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.  फॅमिली फिजिशियनच्या कार्यालयात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजय गुजर व डॉ. स्मिता कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चेस्ट फिजिसीएन डॉ. अनिर्बान बंडोपाध्याय होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळी बंडोपाध्याय म्हणाले की, रुग्णांची काळजी घेणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. याक्षेत्रात काम करणारे अनेक डॉक्टर सेवाभावीपणे कार्य करत असल्याने त्यांचा गौरव करणे योग्य ठरते. निमा न्यू नाशिक व फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या वतीने येथे डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. मोहन टेंबे, डॉ. बी. बी. देशमुख आणि डॉ. स्वाती घरटे यांचा सत्कार करण्यात आला.  डॉ. अजय पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. अभय शुक्ल आणि डॉ. स्वप्नील गिरणारकर यांनी केले. यावेळी डॉ. विश्वास देशपांडे, डॉ. राजश्री जोशी, प्रमोद आहेर यांच्यासह असोसिएशनचे सर्व डॉक्टर उपस्थित होते.

Web Title: Three doctors felicitated for remarkable work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.