नाशिक : पुणे महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस बसने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३१) सायंकाळी ७.३० च्या सुमारास एमएच ११ बीएल ९४६८ क्रमांकाच्या बसने पादचारी महिलेस धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मखमलाबाद शिवारात कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.३१) घडली. एमएच १५ डीएस ५३२२ क्रमांकाच्या कारची एमएच १५ जीक्यु ९३१३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विजय पंढरीनाथ धनगर (रा. त्र्यंबकेश्वर) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला. तसेच जेलरोड परिसरात एमएच ०४ जी ४३४३ क्रमांकाच्या बसने धडक दिल्याने पायी चालणारे बाबुराव यशवंत शिंदे (८०, रा. दत्त मंदिर रोड) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 15:30 IST
जेलरोड परिसरात एमएच ०४ जी ४३४३ क्रमांकाच्या बसने धडक दिल्याने पायी चालणारे बाबुराव यशवंत शिंदे (८०, रा. दत्त मंदिर रोड) यांचा मृत्यू झाला
शहरातील वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू
ठळक मुद्देमृतांमध्ये महिलेसह ८० वर्षीय वृद्धाचा समावेश आहेम्हसरुळ पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा