कोरोनामुळे चोवीस तासांत तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST2020-06-12T22:33:32+5:302020-06-13T00:09:59+5:30
नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या धक्कादायक रीत्या वाढत असून, गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहेत, तर दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुळे चोवीस तासांत तिघांचा मृत्यू
नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या धक्कादायक रीत्या वाढत असून, गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहेत, तर दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
नाशिक शहरात आता कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्याचप्रमाणे मृतांची संख्यादेखील वाढत आहे. सारडा सर्कल येथील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचार सुरू असताना तिचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला, तर वडाळानाका येथील रेणुकानगर परिसरातील एका ५९ वर्षीय वृद्धास कफ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. याच भागातील वडाळानाका येथील काळे चौकातील ५६ वर्षीय महिलेचेदेखील शुक्रवारीच निधन झाले. दरम्यान, गुरुवारी रात्री शहरात विविध भागांतील २२ संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात गीतांजली कॉलनी, प्रथमेशनगर, गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, गायकवाडनगर, पंचवटीतील कालिकानगर परिसरातील फुलेनगर, भराडवाडी येथील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. कालिकानगर येथील दोघांवर डॉ. झाकीर हुसेन, तर कालिकानगर येथील तिघांवर समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात उपचार सुरू आहेत.