शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

तिघा दरोडेखोरांना  सात दिवसांची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:21 IST

नाशिक शहरातून चारचाकी तसेच दुचाकी चोरी करीत आडगाव शिवारात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघा संशयित आरोपींची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पंचवटी : नाशिक शहरातून चारचाकी तसेच दुचाकी चोरी करीत आडगाव शिवारात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघा संशयित आरोपींची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये उडालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना शुक्रवारी (दि.२९) न्यायालयात हजर केले असता तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आडगाव शिवारात गुरुवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी हरदीपसिंग टाक, राजेश टाक, अमनसिंग टाक, सुनीलसिंग जुनी व त्यांचा मित्र लखन या संशयितांनी सायखेडा परिसरात दरोडा टाकला होता. त्यानंतर त्यांनी आडगाव शिवारातील ज्वेलर्सचे कुलूप तोडून संदेश रक्ताटेला धारदार कोयता लावून मारण्याचा प्रयत्न केला  होता.पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर संशयितांनी चोरी केलेल्या एमएच १५ बीडी ९०६६ क्रमांकाच्या कारमधून पलायन करीत असताना दरोडेखोरांची कार उलटली. त्यामुळे बचावासाठी दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केल्याने या परिसरात काही वेळ चकमक उडाल्यानंतर पोलिसांनी राजेश टाकला ताब्यात घेतले होते. पंरतु पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात उडालेल्या चकमकीदरम्यान हार्दिक टाक व सुनीलसिंग जुनी या दोघांनी पळ काढला. त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते.न्यायालयात हजरया तिघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान,या घटनेत पलायन करण्यात यशस्वी झालेल्या अमनसिंग व लखन या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस