मालेगावी विवाहिता छळाच्या तीन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST2021-08-01T04:14:55+5:302021-08-01T04:14:55+5:30

दुसऱ्या घटनेत विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक, मानसिक छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Three complaints of marital harassment in Malegaon | मालेगावी विवाहिता छळाच्या तीन तक्रारी

मालेगावी विवाहिता छळाच्या तीन तक्रारी

दुसऱ्या घटनेत विवाहितेच्या चारित्र्याचा संशय घेऊन शारीरिक, मानसिक छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाग्यश्री प्रभाकर बागुल या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती प्रभाकर निंबा बागुल, निंबा देवराम बागुल, लता देवराम बागुल यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------

पिकअपसाठी छळ, चौघांविरुद्ध गुन्हा

पिकअप घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शीतल बाळासाहेब देवरे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती बाळासाहेब वसंत देवरे, अंजनाबाई वसंत देवरे, वसंत देवरे अण्णा देवरे (सर्व राहणार एरंडगाव) यांनी पिकअप विकत घेण्यासाठी पैसे आणावेत म्हणून छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Three complaints of marital harassment in Malegaon