पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन लहान मुलांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:22 IST2019-01-08T01:22:29+5:302019-01-08T01:22:57+5:30

गोरेवाडी शास्त्रीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात व विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

 Three children with lewd dogs attacked | पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन लहान मुलांवर हल्ला

पिसाळलेल्या कुत्र्याचा तीन लहान मुलांवर हल्ला

नाशिकरोड : गोरेवाडी शास्त्रीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात व विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.  गोरेवाडी शास्त्रीनगर येथे रविवारी सायंकाळी काही लहान मुले घराच्या परिसरात खेळत होती. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने सुशांत सुभाष राठोड (वय ८), प्राप्ती सचिन कर्डक (वय ९), कार्तिकी राजु आहेर (वय ७) या तीन लहान मुलांवर एकामागोमाग एक हल्ला करत ठिकठिकाणी चावा घेतल्याने मुले गंभीर जखमी झाली आहेत. अचानक पिसाळलल्या कुत्र्याने हल्ला केल्याने मुले भयभीत होऊन ओरडत सैरावैरा पळु लागली. त्या पिसाळलेल्या कुत्र्याने मुलांच्या हातांना, तोंडावर, खांद्यावर, पाठीवर चावा घेऊन गंभीर जखमी केले. मुलांच्या आरडाओरडीमुळ परिसरातील रहिवासी पळत बाहेर आल्यानंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्याने धूम ठोकली. जखमी मुलांना त्वरित रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा व मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे रहिवाशांमध्ये व विशेष करून लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title:  Three children with lewd dogs attacked