जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटून तीन बैल ठार
By प्रसाद गो.जोशी | Updated: March 28, 2024 14:00 IST2024-03-28T13:57:51+5:302024-03-28T14:00:06+5:30
अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटून तीन बैल ठार
शशिकांत बिरारी, कंधाणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातून पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी पाच बैल घेऊन भरधाव वेगाने जाणारी एक कार (क्रमांक एमएच४३एल १०८२) तळंग फाट्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने येथील पाटचारीत पडून झालेल्या अपघातात तीन बैल ठार झाले असून दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत . अपघातग्रस्त वाहन पाटचारीत पडल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैलांना बाहेर काढले. अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
याबाबतची खबर माजी पोलिस पाटील बाळू बिरारी यांनी दूरध्वनी वरुन सटाणा पोलिस स्टेशनला दिली आहे. घटनेची माहिती समजताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक खैरनार , दत्ता आहेर घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अपघातातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या बैलांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले.पुढील तपास सटाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेवाळे करीत आहेत.