नाशकात पाच लाखाच्या गुटख्यासह तिघांना अटक

By नामदेव भोर | Updated: June 22, 2023 18:21 IST2023-06-22T18:21:06+5:302023-06-22T18:21:16+5:30

तब्बल ५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Three arrested with gutka of five lakh in Nashkat | नाशकात पाच लाखाच्या गुटख्यासह तिघांना अटक

नाशकात पाच लाखाच्या गुटख्यासह तिघांना अटक

नाशिक  : शहरातील वडाळागाव परिसरात अण्णाभाऊ साठेनगरमध्ये संशयित मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर अन्सारी, मोहम्मद दिलशार इस्लाम मुद्दिन मलिक, मोहम्मद जुबेर दिलशार अली अन्सारी, या तिघांना राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणात अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ५ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावात संशयित मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर अन्सारी, मोहम्मद दिलशार इस्लाम मुद्दिन मलिक, मोहम्मद जुबेर दिलशार अली अन्सारी प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती बुधवारी (दि.२१) गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार रात्री बारा वाजेच्या सुमारास वडाळा गावातील अण्णाभाऊ साठेनगर येथे पोलिसांनी सापळा रचून दुचाकी ( एमएच १५ एचपी ३०४०) वर गुटखा घेऊन संशयित मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर अन्सारी मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मलिक व अन्सारी यांच्याकडून त्याने गुटखाआणल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरावर छापा मारून त्यांच्याकडूनही गुटख्याचा मोठा साठा जप्त केला असून या कारवाई सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

संशयित मोहम्मद साजिद मोहम्मद नासिर अन्सारी (२८ रा. सादिकनगर, वडाळा गाव), मोहम्मद दिलशार इस्लाम मुद्दिन मलिक (३१) व मोहम्मद जुबेर दिलशार अली अन्सारी (२५,अण्णाभाऊ साठेनगर,वडाळा गाव) या तिघांना अटक करण्यात आली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three arrested with gutka of five lakh in Nashkat