दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 19:20 IST2018-09-05T19:20:33+5:302018-09-05T19:20:57+5:30

मालेगाव शहर- परिसरातुन तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून दुचाकी चोरुन कमी किंमतीत विक्री करणाºया तिघा संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Three arrested two thieves thieves | दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

शहरातील विविध भागातुन दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. शहरात कमी किंमतीत दुचाकी विकणारी टोळी असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील सवंदगाव फाटा भागात सापळा रचून फय्याज अहमद रियाज अहमद (२५) रा. सवंदगाव फाटा, अजीज उर्फ जुम्मन अहमद नजीर अहमद (३४) रा. जाफरनगर यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. या दोघांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी शहरातील इतर ठिकाणासह चाळीसगाव येथून दुचाकी चोरल्याची तसेच या चोरीत मोहंमद एकलाख मोहंमद शरीफ (२२) रा. कलीकुट्टी याचाही सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मालेगाव येथील किल्ला, छावणी, आझादनगर तसेच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, सुनिल अहिरे, पोलीस हवालदार वसंत महाले, राजु मोरे, सुहास छत्रे, रतिलाल वाघ, सुनिल पानसरे, राकेश उबाळे, फिरोज पठाण आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three arrested two thieves thieves