दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक

By Admin | Updated: September 2, 2016 23:07 IST2016-09-02T23:06:41+5:302016-09-02T23:07:36+5:30

गुन्हे शाखा : मुद्देमाल जप्त; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

Three arrested for stealing jewelery stolen | दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक

दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक

 नाशिक : येथील बालाजी कोट परिसरातील सराफ दुकानातून चोरी केलेले दागिने विक्रीसाठी आलेल्या तिघा भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराफ बाजार परिसरातून ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाच दिवसांपूर्वी बालाजी कोट येथील एका दुकानातून तिघा चोरट्यांनी चांदीच्या अंगठ्यांची चोरी केली होती. सदर चोरटे सराफ बाजारात अंगठ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई शांताराम महाले यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांना सदर माहिती दिली. देशमुख यांनी तत्काळ गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून सराफ बाजाराच्या परिसरात सापळा रचला. तिघे चोरटे अंगठ्या व्रिकी करण्यासाठी आले असता त्यांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून त्यांच्याकडून साडेबारा हजार रुपये किमतीचे ३५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या अंगठ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून अधिक दागिने चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three arrested for stealing jewelery stolen