जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST2020-12-30T04:20:09+5:302020-12-30T04:20:09+5:30
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष गोवंश पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना हिरापुरा येथे तीन पिकअप ...

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष गोवंश पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांना हिरापुरा येथे तीन पिकअप वाहनातून गोवंश जातीचे जनावरे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार काळे, हवालदार वसंत महाले, मंडलिक, बोराळे, शिरोळे, कोळी आदी कर्मचाऱ्यांनी तीनही वाहने येताच वाहनांना घेरले. यात शेख जावीद शेख महेबुब (३५), अकबर खान हमीद खान (३६), एकबाल ईलायत पिंजारी,(३२) तीनही रा.चाळीसगाव या वाहनचालकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगरसेवक इस्राईल खान कुरैशी यांचा माल असल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर कारवाईत तीन लाख ५५ हजार रुपये किमतीची १२ जनावरे व सात लाख ५० हजाराची तीन पिकअप वाहने असा एकूण अकरा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही वाहनचालकांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित इस्त्राईल खान इस्माईल खान कुरैशी हा फरार झाला आहे.