नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:27 PM2020-03-26T23:27:27+5:302020-03-26T23:27:41+5:30

निफाड तालुक्यातील नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा संशयिताना अटक केली आहे. या तिघांना निफाड न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी. काळे यांच्या समोर हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Three arrested for murder of Natale youth | नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी तिघे अटकेत

नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी तिघे अटकेत

Next
ठळक मुद्देगुन्ह्याचा उलगडा : स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई; संशयिताना पोलीस कोठडी

लासलगाव : निफाड तालुक्यातील नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा संशयिताना अटक केली आहे. या तिघांना निफाड न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी. काळे यांच्या समोर हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रतापसागर तलावाजवळ पालखेड कालव्यात अनिल दत्तू पवार (रा. गाजरवाडी रोड, नैताळे, ता. निफाड ) याचा मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. मयत युवकाच्या दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर माहिती घेतली असता अनिल पवार हा दि. २२ मार्च रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास नैताळे येथून त्याचे घरातून बाहेर पडल्याचे समजले. त्यावरून पथकाने तपासाची चक्रे फिरविली. नैताळे गाव व आजूबाजूच्या गावातील सर्व परिसर पोलिसांनी पिंजून काढला. गोपनीय माहितीनुसार अज्ञात मारेकरी हे नैताळे गावातीलच असल्याचा संशय बळावला.
त्याप्रमाणे पथकाने नैताळे येथून सिद्धार्थ नाना घेगडमल (वय २१) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने त्याचे
साथीदार सचिन नाना काळे (२१), विशाल रंगनाथ भाटे (२१, रा . सायगाव, ता. येवला) व एक विधिसंघर्षित बालक यांचेसह अनिल पवार यास कुºहाडीने डोक्यावर वार करून जिवे ठार मारल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घडलेला घटनाक्रम कथन
केला. संशयित सचिन काळे याचेकडे असलेली फोक्सवॅगन कंपनीच्या वेटो
कारचे व्यवहारासाठी अनिल पवार यास बोलविण्यात आले होते. सदर वेटो
कारचे व्यवहारावरून वाद झाले, त्यात सर्वांनी मिळून अनिल पवार याचे हात पाय धरून कुºहाडीने जोरदार वार केले. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने
पवार याचा मृतदेह वेटो कारच्या डिक्कीत टाकून तो डोंगरगाव शिवारातील पाटाचे पाण्यात फेकून दिला. याशिवाय पवार याची मोटर सायकल रूई ते धारणगावदरम्यान एक्सप्रेस पाटाचे झुडपात लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली फोक्सवॅगन वेंटो कार (क्रमांक एमएच ०४- १६८१) ही जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Three arrested for murder of Natale youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.