शस्त्राने वार करून लूट करणाऱ्यांना तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST2021-03-20T04:14:27+5:302021-03-20T04:14:27+5:30

पंचवटी : आडगाव शिवारातील मिरची चौकात गाडीला कट मारल्याची कुरापत काढून पाथर्डी फाटा येथे राहणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करून ...

Three arrested for armed robbery | शस्त्राने वार करून लूट करणाऱ्यांना तिघांना अटक

शस्त्राने वार करून लूट करणाऱ्यांना तिघांना अटक

पंचवटी : आडगाव शिवारातील मिरची चौकात गाडीला कट मारल्याची कुरापत काढून पाथर्डी फाटा येथे राहणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करून खिशातील १९ हजार रुपयांची रोकड लूटणाऱ्या तिघा संशयित आरोपींच्या आडगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथून सोमनाथ कचरू पालवे व त्याचा मित्र तायडे असे दोघेजण दुचाकीवरून घराकडे जात असतांना संशयित दिपक भारत बागुल, विजय दत्तू कळसकर आणि सनी राजू धोत्रे आदींनी रस्त्यावर दुचाकी आडवी लावून कट का मारला या कारणावरून कुरापत काढून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच हातावर धारदार शस्त्राने वार केला व खिशातील १९ हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून तिघांना अटक केली आहे. पोलिस हवालदार सुरेश नरवडे, दशरथ पागी, विजय सूर्यवंशी, आदींनी कामगिरी केली. पोलिसांनी त्यांच्याकडून साडे तीन हजार रुपये रोकड व गुन्हयात वापरलेले वाहन जप्त केले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Three arrested for armed robbery