शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

साडेतीन लाखांचे दागिणे लंपास : लग्नसराई अन् सुटीचा हंगाम ठरतोय पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 7:35 PM

ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

ठळक मुद्दे‘रेकी’ करून बंद घरांना लक्ष्य पोलीस गस्त थंडावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी हिसकावणे, विनयभंग यांसारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. गंगापूर रोडवरील दातेनगर भागात एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने चोरटे डाव साधत ‘रेकी’ करून बंद घरांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वसंत श्रावण बाविस्कर (६८, रा. ऋतुराज बंगला) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उघडून १ लाख ६० हजार रुपयांच्या आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, १ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील आभूषणांचे पंधरा नग, १५ हजारांची रोकड असा सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस. आर. साबळे करीत आहेत. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून, शहरातील उच्चभ्रू वसाहतीचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट असून, या भागात पोलीस गस्त थंडावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालये, शॉपिंग मॉलची संख्या आहे. तसेच उच्चभ्र नागरिकांचे बंगले, रो-हाउस, अपार्टमेंट असून, या भागात चोरट्यांनी वक्रदृष्टी केली अहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी