खंडणी वसुलीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:08 IST2019-07-18T00:07:31+5:302019-07-18T00:08:25+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० हजारांच्या खंडणीसाठी भाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाऱ्या व्यापाºयाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांची सायंकाळी पोलिसांनी परिसरातून धिंड काढली.

खंडणी वसुलीप्रकरणी तिघांना अटक
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० हजारांच्या खंडणीसाठी भाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाऱ्या व्यापाºयाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांची सायंकाळी पोलिसांनी परिसरातून धिंड काढली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.१५) सकाळी राजेंद्र भागवत काटकर दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी आले. यावेळी संशयित आरोपी सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे या त्रिकुटाने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान, कुणालने त्याच्याजवळील गावठी पिस्तूल काढून राजेंद्र काटकर यांच्या डोक्याला लावत धमकावले. ‘सायंकाळपर्यंत पन्नास हजार रु पये दे, नाही तर तुझा गेम करून टाकू’ असे म्हणून दगड उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने तुला नंतर बघून घेतो असे म्हणून दम दिल्याचे काटकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, पोलिसांनी संशयित सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे यांना अटक केली आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
भरेकºयाचा मुलगा
भाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाºया व्यापाºयाकडे खंडणी मागणाºया तिघा संशयित आरोपींमध्ये बाजार समितीत भाजीपाला भरेकºयाच्या मुलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हेच संशयित बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मारहाण करून रोकड लुटत असल्याचे बोलले जात आहे.