अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिक्षाचालक खून प्रकरणातील फरारी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:59 IST2017-12-30T00:58:24+5:302017-12-30T00:59:11+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिक्षाचालक खून प्रकरणातील फरारी तिघांना अटक
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात बुधवारी (दि. २७) घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरारी आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी महाकाली चौकातील रहिवासी प्रवीण राजेंद्र शिंगटे, कामटवाडा गावातील दर्शन उत्तम दोंदे, मुरारीनगरमधील किरण महेंद्र निरभवणे, सातपूर कॉलनीतील विनोद सुरेश घरत ऊर्फ नेपाळी, अंबिकानगरमधील महेश ऊर्फ नाना आनंदा पगार यांना यापूर्वीच अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची १ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी महाकाली चौकातील गणेश राजेंद्र शिंगटे, वावरेनगर येथील संतोष अरुण जाधव व लोकमान्यनगर येथील भावेश राजेंद्र खैरनार यांना नाशिक परिसरातून अटक करण्यात आली आहे.