बनावट फेसबुक अकाउंंटद्वारे महिलेला धमकी
By Admin | Updated: June 9, 2017 18:17 IST2017-06-09T18:17:07+5:302017-06-09T18:17:07+5:30
महिलेचा फोटो वापरून तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे बदनामीची धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे़

बनावट फेसबुक अकाउंंटद्वारे महिलेला धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महिलेचा फोटो वापरून तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाउंटद्वारे बदनामीची धमकी देणाऱ्या संशयिताविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील गुलमोहर कॉलनीतील एका महिलेने तक्रार केली आहे. संशयित विकी श्रीवास्तव याने या महिलेच्या फोटोचा गैरवापर करून फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले होते़ ही बाब महिलेच्या लक्षात आल्याने तिने संपर्क साधला असता प्रथम भेटण्यास यावे, अन्यथा तिच्या पतीस सोशल मीडियाद्वारे फोटो पाठविण्याची धमकी देण्यात आली होती़.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़