शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

आॅनलाइन स्टॉकर्सचा महिला सुरक्षेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:55 AM

नाशिक : विविध सोशल नेटवर्किंग साइटवरून फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत असताना आॅनलाइन स्टॉकर्सने महिलांभोवती आर्थिक फसवणुकीबरोबर मानसिक छळ, छायाचित्रांचा गैरवापर करून विनयभंग, फेक अकाउंट काढून बदनामी करणे अशा विविध विकृत कृ त्यांच्या विळखा घातल्याने महिला सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखबरदारी आवश्यक : इंटरनेटद्वारे खासगी माहिती मिळवून छळाचे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विविध सोशल नेटवर्किंग साइटवरून फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत असताना आॅनलाइन स्टॉकर्सने महिलांभोवती आर्थिक फसवणुकीबरोबर मानसिक छळ, छायाचित्रांचा गैरवापर करून विनयभंग, फेक अकाउंट काढून बदनामी करणे अशा विविध विकृत कृ त्यांच्या विळखा घातल्याने महिला सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १२ प्रकरणांमध्ये अशाप्रकारे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमांतून महिलांचा पाठलाग करण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा आॅनलाइन सॉक्टर्सच्या या विळख्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी महिलांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा सायबर गुन्हेगारांचा सामना करण्यासाठी सक्षम बनण्याची गरज निर्माण झाली आहे.इंटरनेट येण्यापूर्वी पत्र पाठवून स्त्रियांचा छळ होत होता. आता तंत्रज्ञानाच्या युगात पत्रांची जागा ई-मेलने घेतली आहे. बऱ्याचदा ई-मेलद्वारे स्त्रियांना अथवा मुलींना ब्लॅकमेल करणे, धमकाविणे इत्यादी प्रकार घडतात. बहुतांश घटनांमध्ये जवळच्याच व्यक्ती यामध्ये गुंतलेल्या आढळतात. ‘सायबर स्टॉकिंग’ या प्रकारात इंटरनेटच्या माध्यमातून पीडित व्यक्तीला त्रास दिला जातो. बºयाचदा या प्रकारामधील गुन्हेगार हा प्रेमभंग झालेला किंवा एकतर्फी प्रेम करणारा असतो. काही वेळा अपमानित व्यक्ती बदला घेण्याच्या भावनेनेही अशी कृती करत असते, तर काहींनी अशाप्रकारे महिलांना अशाप्रकारे जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा व्यवसाय बनविला आहे. अशा प्रकरणांमध्ये स्टॉकर्सकडून पीडित व्यक्तीची संपूर्ण वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती, फोन क्रमांक आणि पीडित व्यक्तीची दैनंदिनी, या सर्वांची माहिती जमा करून त्याचा वापर त्रास देण्याकरिता केला जातो. ही वैयक्तिक माहिती अश्लील वेबसाइटवरही पोस्ट केली गेल्याचे प्रकारही घडतात. अथवा तशी धमकी दिली जाते. त्यामुळे महिलांनी याविषयी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.आमिषाला बळी पडू नकासध्याच्या आॅनलाइनच्या युगात मॅट्रिमोनिअल साइट किंवा फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्नासाठी जोडीदार शोधताना अनेक मुले-मुली आढळतात. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवर नजर ठेवणारे आॅनलाइन टवाळखोर महिला व मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या जाळ््यात ओढतात. इंटरनेटवरील चॅटिंग/डेटिंग, आॅनलाइन मॅट्रिमोनिअल वेबसाइटद्वारे चॅट करताना स्वत:बद्दलची चुकीची माहिती देऊन प्रेमपाशात अडकविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोणत्याही संकेतस्थळावर खासगी माहिती, फोटो, व्हीडीओ अपलोड करताना खबरदारी घेण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

अशी राखा आपली सुरक्षा

कोणतीही खासगी माहिती, फोटो सोशल मीडियावर टाकून नका.त्रास देणाºया व्यक्तींना तत्काळ ब्लॉक करा. त्यानंतरही त्रास होत असेल तर सायबर पोलिसांची मदत घ्या.अकाउंट्सचे पासवर्ड वारंवार बदलत राहा.आपल्या सोशल मीडिया अकाउंटला भेट देणाºया व्यक्तींची तपासणी करा.मित्र-मैत्रिणींच्या, तसेच ओळखीच्या व्यक्तींच्या अकाउंटवरून काही आक्षेपार्ह संदेश येत असतील, तर त्यांच्याकडून खातरजमा करून घ्या.अनोळखी ई-मेल्स उघडून पाहू नका.फ्रेंडलिस्टमध्ये अनोळखी व्यक्तींचा समावेश टाळा.अनोळखी व्यक्तींशी आॅनलाइन चॅटिंग करू नका.कॉम्प्युटर वापरताना अनोळखी वेब साइटना भेटी देण्याचे टाळा, चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.

टॅग्स :InternetइंटरनेटCrime Newsगुन्हेगारी