शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चोरांच्या घातप्रकाराने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:50 IST

मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या आसपास सहज फिरत असल्यासारखे भासवत अचानकपणे हातातील दगडाने भरलेली पिशवी दुचाकीस्वाराच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडत लुटण्याचा प्रयत्न पाथर्डी फाटा ते पाथर्डी रस्त्याच्या दरम्यान घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

नाशिक : मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या आसपास सहज फिरत असल्यासारखे भासवत अचानकपणे हातातील दगडाने भरलेली पिशवी दुचाकीस्वाराच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडत लुटण्याचा प्रयत्न पाथर्डी फाटा ते पाथर्डी रस्त्याच्या दरम्यान घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.शनिवारची मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पाथर्डीच्या एका नागरिकाला अशाच प्रकारे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दैव बलवत्तर आणि डोक्यात हेल्मेट घातले असल्याने त्या नागरिकाच्या जिवावरचे संकट आणि आर्थिक लुबाडणूक टळली.शनिवारी मध्यरात्रीनंतर कामकाज आटोपून पाथर्डी गावाकडे जाणारे शैलेश पाटील यांच्याबाबत घडलेला हा प्रकार खूपच गंभीर होता. या रस्त्यावरील एका प्रख्यात हॉटेलच्या पुढील भागात त्यांच्यावर तीन जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. अशा प्रकारे पिशवीतील दगडाने मारून दुचाकीस्वाराला खाली पाडत त्याला लुटण्याचा त्यांचा प्रयत्न असण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली. जीव बचावल्याने त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही.मात्र, पाथर्डी रस्त्यावरून मध्यरात्री जाणाऱ्या नागरिकांना या प्रकारामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागण्यासारखीच ही परिस्थिती असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या परिसरात मध्यरात्रीनंतर पोलिसांनी गस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.हेल्मेटमुळे बचावलेदुचाकीस्वार शैलेश पाटील येताच चोरट्यांनी शबनमसदृश पिशवी डोक्याच्या दिशेने मारली. मात्र, पाटील यांनी चपळाईने मान खाली केल्याने तो फटका डोक्यातील हेल्मेटच्या वरील भागाला लागला. त्याक्षणी या दुचाकीस्वाराने वाहनाचा वेग वाढविल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, डोक्यात हेल्मेट नसते तर त्या दगडाच्या फटक्याने प्राणदेखील गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस